वाई बाजार परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाची हजेरी.
श्रीक्ष्रेत्र माहुर/वि.प्र.पद्मा गि-हे
माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात रविवार दि.9 मे रोजी स.10 वाजण्याचे सुमारास विजेच्या कडकडाटात व सोसाट्याच्या वाऱ्यात जोराचा पाऊस झाला.त्यामु़ळे तीळ,भुईमूग आदि उन्हाळी पिकांचे व पालेभाज्याचे अतोनात नुकसान झाले.ऐनवेळी पाऊस आल्याने किरकोळ व्यापा-यांची मोठी फजीता झाली.
सतत एक तास झालेल्या पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यात दि.10 मे पर्यंत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.या बेमोसमी पावसाने काही वेळासाठी गारवा निर्माण केला असला तरी, सूर्यदेव पूर्ण ताकतीने तळपल्या नंतर मात्र तेवढाच उकाडा झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात कोंडून घेतलेल्या नागरिकांना बाहेर पडणेच भाग पडले.
सोसाट्याचा वारा व जोराचा पाऊस झाल्याने उभ्या तिळाला मार बसला ,जमिनीतील भुईमूग,फळ वर्गीय पिकांसह पाले भाज्याचे मोठे नुकसान झाले.किरकोळ दुकानदार व फळ विक्रेत्यांची चांगलीच तांळाबर उडाली.