जिवती: कोलाम बांधवांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी संकल्पबद्ध.- आमदार सुभाष धोटे.
लांबोरी येथे कोलाम बांधवांचा भव्य मेळावा संपन्न.
जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा लांबोरी / कोलामगुडा येथे आदिम कोलम बउद्देशिय संस्था जिवती द्वारा आयोजित कोलाम बांधवांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, कोलाम बांधव हे जिवती, कोरपाना, राजुरा तालुक्यात पिढ्यानपिढ्या पासून वास्तव्यास आहेत. यांच्या अनेक समस्या, प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत असून आजपर्यंत अनेकांना सुविधा व लाभ मिळवून दिला आहे. यापुढेही कोलाम बांधवांना तसेच येथे वास्तव्यास असलेल्या समस्त मुलनिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण संकल्पबद्ध असून सदैव आपल्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत अशी भूमिका स्पष्ट केली. आदिम कोलम बउद्देशिय संस्था ही कोलामांनी कोलामांसाठी निर्माण केलेली संस्था असून सर्व समाजबांधवांनी यामाध्यमातून एकत्र येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी, प्रगतीसाठी संघर्ष करावा तसेच बाहेरून येऊन कोलामांचा वापर वैयक्तिक हितासाठी करून कोलाम आदिवासींची दिशाभूल करणाऱ्या तथाकथित समाजसेवकांपासुन सावध रहावे असे आवाहन केले.
या प्रसंगी मेळाव्याचे उद्घाटन, चर्चासत्र व थेट संवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिम कोलमांचे दैवत वीर शामादादा कोलाम यांच्या नावाचा जयघोष करून स्मरण करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिम कोलम समाजातील २४ स्थानिक नागरिकांना जातप्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू पावलेल्या करिश्मा मुत्ता सिडाम हिच्या कुटुंबियांना ४ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. याकार्यक्रमाचे उद्घाटक प्र.अ.आ. विकास विभाग, चंद्रपूरचे रोहन धुगे हे होते, प्रमुख अतिथी डी.सी. एफ. वनविभाग, चंद्रपूरचे अरविंद मुंडे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, प्रमुख पाहुणे लांबोरीचे सरपंच रेखाबाई कोडापे, जिवतीचे गट विकास अधिकारी आस्कर, यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घोटेकर, माजी जि प सदस्य भीमरावपाटील मडावी, सभापती अंजनताई पवार, आदिम कोलम बउद्देशिय संस्थेचे मुख्य संयोजक प्रा. सुग्रीव गोतावळे, यवतमाळचे कोलाम संघटनेचे अध्यक्ष राहुल आत्राम, जिवतीचे प स सदस्य सुनिल मडावी, को. संघ, उपाध्यक्ष, अदि बोरण संस्था, मुंबई चे सुदर्शन आत्राम, जिवती येथील सामाजिक कार्यकर्ते चिन्नु कोडापे, माजी सभापती तुकाराम सिडाम, झाडु कोडापे, सरपंच नागपुर, जालीम कोडापे तंटामुक्ती समीती अध्यक्ष ईत्तरराव आत्राम, कोलामी गायक व सामाजीक कार्यकर्ता विमलबाई कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिम कोलम बउद्देशिय संस्थेचे सचिव सुरेश कोडापे यांनी केले, संचालन संस्थेचे कोषाध्यक्ष रामा कुमरे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष दादाराव टेकाम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिम कोलम बउद्देशिय संस्थेचे मुख्य संयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आनंद मडावी, सचिव सुरेश कोडापे, सहसचिव लच्चु मडावी, कोषाध्यक्ष यासह कोलाम बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठय़ा संख्येने कोलाम बांधव उपस्थित होते.