स्थानिक विकास निधीतून दिव्यांगांच्या राखीव निधी 10 लक्ष रुपये खर्च करा-राज माहुरकर
किनवट प्रतिनिधी
जागतिक अपंग दिनानिमित्त दिनांक 03/12/2021 रोजी अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने आमदार भीमराव केराम यांना अर्ज देऊन राखीव निधी 10 लक्ष रुपये खर्च करण्या संबंधि दुसऱ्यांदा विनंती अर्ज दिला.
किनवट माहूर तालुका हा अतिशय डोंगराळ व आदिवासी तालुका म्हणून शासनदरबारी ओळख आहे अशा या विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम हे निवडून आल्याने सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत यामध्ये कोरोणा काळाने तर भल्याभल्यांना जेरीस आणले होते व आजही परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी बराच काळ लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये अपंग बांधवांचे हाल तर न बोललेले बरे अशी अवस्था झाली असताना गेल्या वर्षापासून राज माहुरकर लढत असून बऱ्याच पैकी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाले असले तरी शासन निर्णयानुसार स्थानिक विकास निधी मधील राखीव 10 लक्ष रुपये गेल्यावर्षी मागणी करून मिळाली नसल्याचे अर्जात नमूद केले आहे परंतु या वर्षी तरी आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी दिव्यांगांच्या राखीव 10 लक्ष रुपये येणाऱ्या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगावर खर्च करावा अशी अपेक्षा संघटनेचे सचिव यांनी अर्जाद्वारे व्यक्त केली