हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष : माजी खासदार ऍड शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली इसापूरच्या डाव्या कालव्यात ३० डिसेंबर रोजी जन आंदोलन !
हिंगोली/प्रतिनिधी: हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष संदर्भात वेळीच तीव्र जन आंदोलन छेडले नाही तर भविष्यात हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होण्यास वेळ लागणार त्यामुळे हीच वेळ आहे हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरून काढण्याची म्हणूनच येत्या ३० डिसेंबर रोजी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये सर्व शेतकरी व पदाधिकाऱ्यांसह माजी खा. ऍड. शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे , खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली येथे ( दि. १२ डिसें) झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत सांगितले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे .
हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांच्यासह जि. प.अध्यक्ष गणाजी बेले, माजी खा. ऍड . शिवाजी माने,शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आ. संतोष बांगर, आ. तानाजी मुटकुळे, संजय बोंढारे, दिलीप चव्हाण, युवा सेना जिल्हाध्यक्ष राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार हेमंत पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले कि, कयाधू नदी वरील खरबी येथे बंधारा उभा करून त्याद्वारे ९ किलोमीटरचा बोगदा व ७ किलोमीटरच्या कॅनॉल द्वारे ईसापुर धरणामध्ये पाणी पोहचविण्याचा घाट घालण्यात आला आहे. याकरिता ३५० कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. असे घडल्यास संपूर्ण कयाधू नदी कोरडी होऊन हिंगोली जिल्ह्याच्या वाळवंट होणार आहे. जिल्ह्यात मंजूर असलेले सिंचनाचे १४० प्रकल्प तात्काळ मार्गी लावावे, यासह अनेक मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली . तसेच या महत्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सिंचन संघर्ष शिष्टमंडळसह भेट घेणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले. याकरिता सर्व हिंगोलीकरानी वेळीच जनआंदोलन न उभे केल्यास जिल्ह्याचा वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही . त्यामुळे या प्रश्नांची तीव्रता लक्षात यावी याकरिता ईसापुर धरणातून सोडण्यात येणारे पाणी ३० डिसेंबर रोजी थांबविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, विठ्ठल चौतमाल, नंदकिशोर खिल्लारे, अंकुश आहेर, सुवर्णमाला अवधूत शिंदे, बालासाहेब मगर, रामराव वाघडव, बाबा नाईक, ऍड . केशवराव सिरसाट, दिगंबर कदम, परमेश्वर मांडगे, खलिल बेलदार, इंजि. पी आर देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, उत्तमराव शिंदे, गोपू पाटील, रामरतन शिंदे, काशिराव पतंगे, देवीकांत देशमुख, मधुकरराव मांजरमकर, यादवराव घुगे, पराग अडकिने, दत्ता माने, कानबा गरड, माधव चौतमाल, सदाशिव चौतमाल, रमेश जाधव, संतोष राठोड, केशव पतंगे, लिंबाजी पठाडे, सुरेश नागरे, संतोष राठोड, पंढरीनाथ मगर, दत्तराव इंगळे, गुलाबराव सरकटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.