बिलोली गटविकास अधिकाऱ्यास मारहाण : पंचायत समितीच्या उपसभापती विरुद्ध गुन्हा नोंद
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.11. जिल्ह्यातील बिलोली पंचायत समितीतील सदस्य आणि बीडीओ यांच्यात सुंदोपसुंदी सुरू आहे.बीडीओ मनमानी करतात,असा आरोप त्यांच्यावर आहे.पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेणे सुचविलेल्या कामांना जाणीवपूर्वक टाळणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे आदी
बिलोली पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना पंचायत समितीचे उपसभापती शंकर महादेव यंकम यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना काल बुधवारी घडली.सदर प्रकरणी रात्री उशिरा बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेने पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बिलोली पंचायत समितीचे सदस्य आणि बीडीओ यांच्यात सुंदोपसुंदी सुरू आहे. बीडीओ मनमानी करतात, असा आरोप त्यांच्यावर आहे. पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेणे सुचविलेल्या कामांना जाणीवपूर्वक टाळणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे आदी आरोपही बीडीओवर आहेत. त्याचबरोबर तक्रारदार व कामासाठी आलेल्या नागरिकांना अरेरावीची भाषा वापरणे हे त्यांचे नित्याचेच काम झाले आहे. त्यामुळे यापुर्वी सुध्दा सदस्य आणि नाईक यांच्यात मोठा वाद झाला होता.
त्यावेळी चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आले होते. मात्र नंतर तडजोडी झाल्याने वादावर पडदा पडला होता.
आपल्या वागण्याने वादग्रस्त ठरलेल्या गटविकास अधिकारी प्रकाश नाईक आणि सदस्यात मागील काही दिवसापासून कुरबुरी चालूच होत्या त्याचे पर्यवसान मारहाण करण्यापर्यंत बुधवारी गेले.
काल दि. १० रोजी बुधवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी उपसभापती शंकर यंकम यांनी प्रकाश नाईक यांना बोलावून तुझा मोबाईल कसा काय बंद आहे असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.आणि एका शिक्षकाच्या समोरच गटविकास अधिकाऱ्यांना खोलीत डांबून मारहाण केली असल्याचा आरोप होत आहे.
या घटनेनंतर ते नांदेडला गेले व रात्री उशिरा बिलोलीत दाखल होवून ठाण्यात तक्रार दिली.रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेने बिलोली तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. गटविकास अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खातेप्रमूख व संघटनेची आज सकाळी १० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
सदरच्या प्रकरणाला पंचायत समीतीमधील टक्केवारी व पंचायत राज समीतीसाठी जमा केलेल्या रक्कमेतून करण्यात आलेला घोळाची किनार असल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तूळात होत आहे.