पत्रकार बालासाहेब शिंदे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
जळकोट / प्रतिनिधी गोपाळ केसाळे
येथील समाजसेवक तथा आरोग्य दूत व सामाजिक कार्यकर्ता २५ वर्षांपासून निस्वार्थ व निष्कलंक पणे पत्रकारिता करणारे संजय उर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय तथा उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला असल्याचे जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरचे राज्याध्यक्ष प्रा. विवेक सुकणे व मराठा सेवा संघ उदगीर चे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे यांनी नियुक्ती पत्राद्वारे कळविले आहे.
जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर व मराठा सेवा संघ शाखा उदगीर तर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, युवा, जागर, शेती, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर, शिक्षक, ग्रामीण विकास, पत्रकारिता या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी,डॉक्टर व पत्रकार पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात गत २५ वर्षांपासून निस्वार्थी व निष्कलंक सेवा केल्याबद्दल अतनुर तालुका जळकोट येथील पत्रकार संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना मिळाला आहे. रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी रघुकुल मंगल कार्यालय, तिसरा मजला, नांदेड रोड, उदगीर जिल्हा लातूर येथे सकाळी ११:३० वाजता. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण राज्यमंत्री ना. शिवश्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते व जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री प्रा. विवेक सुकणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समिती उदगीर चे सभापती शिवश्री प्रा.डॉ.शिवाजीराव मुळे, उदगीरचे उपजिल्हाधिकारी शिवश्री प्रवीण मेंगशेटटी, तहसीलदार शिवश्री रामेश्वर गोरे या प्रमुख पाहुण्याच्या व मराठा सेवा संघ लातूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री रोहन जाधव, उदगीरचे उद्योगपती शिवश्री बिपीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अजित पाटील तोंडचिरकर, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा सचिव शिवश्री मारोती जाधव, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.गोविंद शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार संजय ऊर्फ बालासाहेब शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.