दहेली गावातील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी प्रमोद रामदास पवार यांची बिनविरोध निवड
सारखणी/प्रतिनिधी: दहेली गावात जिल्हा परिषद शाळेचे केंद्र आहे. या केंद्रामार्फत बरेच गावच्या शाळांच्या समाविष्ट आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे शालेय शिक्षण समिती दहेली येथे स्थापन करण्यात आली. या केंद्राचे विस्तार अधिकारी आर आर जाधव, गावचे प्रथम नागरिक राकेश तोटावार, दहेली शाळेचे मुख्याध्यापक हिरामण सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे बजरंग वाडगुरे शिवसेना सर्कल प्रमुख उंमरी ,अजय जाधव, सुहास कारंजेवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्षपदी प्रमोद रामदास पवार तर उपाध्यक्षपदी सौ. ललिता संतोष आदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शालेय शिक्षण समिती सदस्यपदी प्रशांत भोसले, संजय तोटावार,राकेश बोलेनवार ,बजरंग वाडगुरे,सौ. संध्या बोधले, नीलिमा बोईनवाड, सौ. कांचन कारंजेवार, माया निकुडे या सर्व सदस्य समक्ष बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी दहेली शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .बिनविरोध निवड झाल्यामुळे गावात शांतता अबाधित राहण्यासाठी मदत झाली.