किनवट येथे मराठा सेवा संघाचा 31वा वर्धापन दिन साजरा
किनवट शहर प्रतिनिधी(राज माहुरकर)
किनवट येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाचा 31 वा वर्धापन दिन राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संथागार वृद्धाश्रमात पुस्तक व फळे वाटप करून साजरा करण्यात आला.
वृद्धाश्रमाच्या वतीने अरुण आळणे यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे वृद्धाश्रमाची प्रतिमा देऊन स्वागत केले व मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मराठा सेवा संघाने दिलेले योगदान खूप मोठे आहे.आज मराठा सेवा संघाची स्थापना होवून ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.”मराठा तितुका मेळवावा गुणदोषांसह स्वीकारावा” हे ब्रीद घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना युगनायक अॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे केली.असे मत यावेळी बोलतांना बालाजी सिरसाट यांनी व्यक्त केले.
यावेळी संथागार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण आळणे अधिक्षक आकांक्षा आळणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन कदम जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आरसोड, सुमित माने, रितेश मंत्री ईश्वर गुर्लेवाड यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.