माहूर येथे माजी विध्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न,* *शालेय जुन्या आठवणीने माजी विध्यार्थी आनंदित.
माहूर/ प्रतिनिधी
माहुर येथील बालाजी मंगलम येथे गेट टुगेदर दि.१९ सप्टें.रोजी सन १९९० च्या बॅचेच्या विद्यार्थ्यांचा गेट टूगेदर कार्यक्रम संपन्न झाला.त्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरगडाच्या पायथ्याशी बालाजी मंगलम कार्यालयात संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त शिक्षक शंकरराव गोडसे हे होते तर उद्घाटक म्हणून तुकाराम कऱ्हाडे व प्रमुख पाहुणे म्हणून अरुण कोरटकर, आयुब सौदागर ,मंगला मुनेश्वर , नागोराव गोडसे,दवने सर, राजूसिंग राठोड,प्रल्हाद आचकुलवार, श्रीराम भावडे, कोंडीबा खांडेकर, केशवराव पोपुलवार, गोरडे ,सेवक रामराव लांजीकर यांची व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रगीत व प्रतिमापूजना नंतर गुरुजनांचे सर्व शिष्यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले. गुरु परमात्मा परेशु हे वंदन गीत सूत्रसंचलन सुरेश पाटील यांनी आपल्या सुंदर आवाजातून व अभ्यासू वृत्तीतून खूप छान प्रकारे केले. म. खा. हेमंत पाटील यांचा शुभेच्छापर संदेश माया पाटील बोकारे यांनी वाचन केला. बबीता चुंगडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अप्रतिम वक्तृत्व शैलीत भाषण केले.तसेच विना कुलकर्णी, व्यंकटेश पसपुलवार, दादाराव सूर्यवंशी, डॉ.प्रसन्नजी पाडे आमच्या माहुरचे गोर गरिबांचे दाते डॉक्टर कसे असावे याचे उत्तम उदाहरण यांनी आपल्या नेहमीप्रमाणे अभ्यासू व योग्य शब्दात मांडणी करून आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सुरेश पाटील व सर्व टीम कडून जयंत गि_ हे यांच्या सौभाग्यवती पद मा ताई यांना राज्यस्तरीय नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊ सत्कार केला.
गुरुजन्य गुरुजनच असतात गोडसे सर, खांडेकर सर, कराळे सर, यांनी आपल्या बोलण्यातून आजही आपल्याला उपयोगी पडतील असे मार्गदर्शन केले शिक्षक हा सर्वोच्चतम आहे हे आज सिद्ध झाले. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला आपल्या गुरुजनांची कशी गरज असते हे आज कळले आजचा कार्यक्रम नेत्र दिपवून टाकण्यासारखा झाला आयुष्यामध्ये मैत्री या गोष्टीला काय महत्त्व असते आणि मैत्री म्हणजे काय हे पहावयास मिळाले येणाऱ्या पाहुण्यांची व सर्वांचेच डोळ्याचे पारणे फिटले हा माहूर मधील सर्वोच्चतम माजी विद्यार्थी मेळावा ठरला.यावेळी अनेक गेम्स पण घेतली संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या, या मेळाव्यातून खूप मोठी शिदोरी सर्व विद्यार्थी घेऊन गेलेत यावेळी सर्व गुरुजनांची आशीर्वादपर भाषणे झाली. झी वाहिनीची अभिनेत्री कु. वर्धा पाटील व स्वरसंध्या कार्यक्रमातील मिलिंद कांबळे,अभियंता सुरेश गावंडे, अरविंद डांगे, प्रा. प्रतिभा भगत यांचा सत्कार माधुरी देशमुख, डॉ. वर्षा भुतडा, संध्या देव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसन्न पांडे यांनी केले.यावेळी संतोष जयस्वाल,सुनील गोविंदवार, गजानन उपलेंचे वार ,जयंत गि-हे,अंबादास घोगरे,संजय शिंगणकर, अमर मंडलवार, दीपक कांबळे, शेषराव राऊत, कैलास गुप्ता, अंबादास मुकटे, सुनील वानखेडे, शेषराव राठोड,दत्ता पराते, भारत कांबळे,बबीता चुंगडे,,माया पवार ,डॉ. वर्षा भुतडा, विजय सूर्यवंशी, माधुरी देशमुख, हेमाताई,संगीता भलगे, वंदना जाधव विना वांगे,भावना वाघ,अनिता रीठे,मीना जोशी,संध्या देव इत्यादी उपस्थिती होती.
सौ.पदमा जयंत गि-हे, डॉ.सुप्रिया प्रस न्न पांडे,दुर्गा व्यकटेश पस्पुलवर, शारदा सुनील गोविंदवार, अनिता दिनेश आरगुलवार, राधा गजानन उपलचवार, सौ.पाटील मॅम सौ.सूर्यवंशी या सर्वांनी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली जोडीदार कसा असावा या सर्वांकडे पाहून येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्वांच्या सौभाग्यवती पत्नीची गोड तोंडभर स्तुति केले या त्यानंतरही
शाळेला भेट देऊन *”ही दोस्ती मैत्री तुटणार नाही”*(रक्ताच्या नात्या पेक्षा ही श्रेष्ठ असणारी ही मैत्री) या संकल्पनेने
माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत चांगलेच रमले. माहूर येथील श्रीदत्त प्रभू, श्री रेणुका माता व मातृतीर्थ दर्शनानंतर सर्वांना रेणुका माता अनुसया माता दत्तप्रभू यांच्या प्रतिमा भेट वस्तू स्वरूपात देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.