सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली…..!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.1.शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो यंदा पोळा सोमवारी आहे. त्यामुळे केज येथील बाजारात सर्जा राजा साठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी आले आहे.
बाजारात शेतकरी बांधव पोळा सणा करिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण शेतकरी च्या बैलाच्या भरोशावर काळ्या मातीत सेवा करतो.
त्यामुळे त्याच्या घरात अन्नधान्य येते त्यांनी येथे बैलाची कृतज्ञ व्यक्त करण्याबाबद पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणि केली जाते दुसऱ्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने पार पडतो पोळा या सणासाठी शेतकरी बंधू पैशाची जुळवाजुळव करून आवश्यक त्या साहित्याची खरेदी करताना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडे फार चांगले असल्याने शेतकर्यांच्या शेतातिल पिके हि थोड्याफार प्रमाणात चांगली असल्याने बळीराजा पोळा सणा करीता लागणारे साहित्य खरेदी सढळ हाताने करीत असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत बैलाच्या साजाच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.मात्र लाडक्या सर्जा राजा समोर हि वाढ जास्त वाटत नसल्याचे दिसून येत आहे.
*गोधन घटली*
गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील चराई शेत्रात झपाट्याने घट झाली त्याचा परिणाम शेतकर्यांच्या बांधावरील गोधनावर परिणाम झालाय गोधनाची संख्या घटल्याने चांगल्या प्रतीची बैलं देखिल शेतकऱ्यांकडे राहिले नाहीत.त्यातच बरेच शेतकरी आता तांत्रिक पद्धतीने ट्रक्टरद्वारे शेती करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल उरले नाहीत.