तहसील कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट 201 रोजी संपन्न होणार ;या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी जिल्हयाचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण तर उद्घाटन ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार
किनवट : ता प्र दि 14 तहसील कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा ऑनलाइन स्वरूपात उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट 201 रोजी संपन्न होणार आहे या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष पद जिल्हयाचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण हे भूषवणार आहे तर उद्घाटन ना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ना अब्दुल सत्तार लाभणार आहे तर विशेष उपस्थिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अबुलगेकर, खा हेमंत पाटील, आ भीमराव केराम, आ विक्रम काळे, आ सतीश चव्हाण, आ अमरनाथ राजूरकर, आ राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी विनीत इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सभापती हिराबाई आडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या डॉ मृणाल जाधव यांनी या बाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तर प्रथम महिला तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या डॉ मृणाल जाधव यांच्या समोर येथील कारभार सुधारण्याचे आव्हान असून त्या हा आव्हान कशा पेलतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.