किनवट पंचायत समिती अंतर्गत मनरेगा कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार? (गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांना अभय कुणाचे)
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजनेत गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या संगनमताने ग्रामपंचायत स्तरावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी माहे जून पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामदास पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व विभागीय आयुक्त यांच्याकडे देऊन निलंबन करण्याची मागणी केली आहे.
किनवट तालुका हा आदिवासी बहुल भाग असून डोंगर-दऱ्या यांनी व्यापलेला असून एकेकाळी नक्षलवादी विजय कुमार यांच्या दहशतीने गाजलेला होता याच्या नोंदी शासन व प्रशासनाकडे आजही उपलब्ध आहे अशा या तालुक्यात अल्पभूधारक शेतकरी यांचा विकास व्हावा व शेती सिंचनाखाली आनुन शेतकऱ्यांचा विकास हाच देशाचा विकास हा माणस डोळ्यासमोर ठेवून शासनाने मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करण्यात येतात परंतु सदर योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांच्या पदरात मंजूर रक्कम पडत नसल्याने योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रामदास पवार यांनी माहे जून पासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सादर करूनही चौकशी होऊन कारवाई होत नसल्याने दिनांक 13/08/2021 रोजी पत्र देऊन पूर्वी दिलेल्या पाच तक्रारी च्या अनुषंगाने चौकशी करण्याची विनंती केली आहे व त्याच्या प्रति मा जिल्हाधिकारी नांदेड यांनाही देण्यात आलेली असून प्रकरणात चौकशी होईल का? असा प्रश्न पंचायत समिती परिसरामध्ये ऐकावयास मिळत आहे.