कोरोना चा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या आरोग्य पूरक यंत्रसाहित्याचा लोकार्पण सोहळा साने गुरुजी रुग्णालयालय येथे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते संपन्न
किनवट टुडे न्युज । कोरोना चा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या आरोग्य पूरक यंत्रसाहित्याचा साहित्याचा लोकार्पण सोहळा साने गुरुजी रुग्णालयालय येथे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते संपन् झाला. । दि 18 नोव्हेंबर रोजी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात यावेळी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसीलदार डॉ. मृणाली जाधव,धर्मराज हल्लाळे,गंगन्ना नेम्मानीवार यांची उपस्थिती होती. भारत जोडो युवा अकादमी संचालित साने गुरुजी रुग्णालयास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध संस्थानी 26 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ,2 बीप्याप, 7 सी प्याप,1 व्हेंटिलेटर,2मॉनिटर,300 पल्स ऑक्सिमिटर,6000 ट्रिपल लेयर मास्क व 100 पेडिया थर्मा इत्यादी साहित्य दिले आहे ते जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी समाधान व्यक्त केले प्रास्ताविक भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष व साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.सूत्रसंचालन करून अभार प्रदर्शन प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले.
यावेळी माधव बावगे,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, पत्रकार साजिद बडगुजर.एड.अभिजित वैद्य,मधुकर अन्नेलवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट विकास अधिकारी डॉ. धनवे,,बालाजी धोतरे,एड.सर्पे,ज्योतीबा तुमराम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.