माजी आ प्रदीप नाईक यांचे खंदे समर्थक तथा सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बेहरे भाजपात
किनवट प्रतिनिधी: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी आ प्रदीप नाईक यांचे खंदे समर्थक तथा सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बेहरे, बचत गटाच्या अध्यक्षा विमल अडवाल, सरपंच सुनीता लक्ष्मण बेहरे, यांनी त्यांचे शेकडो समर्थक व बचत गटाच्या महिलासह आ भीमराव केराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष एड किशोर देशमुख यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे किनवट येथील लोकार्पण कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने किनवट माहूर विधानसभा विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे पक्षाचे विविध आघाड्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागात जाऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विकासात्मक कामांची माहिती देत असल्याने ग्रामीण भागातील मतदारांचा कल भाजपाकडे वळताना दिसून येत आहे.दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नांदेड जिल्हा अध्यक्ष एड किशोर देशमुख हे 27 जानेवारी रोजी किनवट दौऱ्यावर आलेले असताना आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी आ प्रदीप नाईक यांचे खांदे समर्थक तथा सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बेहरे बचत गटाच्या महिला अध्यक्ष विमल दत्ता अडवाल सरपंच सुनीता लक्ष्मण बेहेरे उपसरपंच राजू जाधव यांनी त्यांच्या शेकडो समर्थक व महिलासह जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे तर यावेळी शिंगोडा, परोटीतांडा,धामणदरीतांडा, लोकरवाडी, मोहडा, जमुनानगर कोठारी येथील सरपंच सुरेश जाधव, सदस्य इंदल राठोड, माजी सरपंच विरसिंग पवार, सुरेश नाईक, सुशील पवार, विजय पवार, विजय राठोड, ग्रा प सदस्य शत्रुघन कुमरे, दामोधर राठोड प्रेम चव्हाण रमेश पवार, अरविंद चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केला. ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष शेखर चिंचोळकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.किनवट येथील लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाला प्राधान्य देत गोरगरीब महिला व नागरिकासाठी महत्वकांक्षी योजना सुरू केल्या त्यामुळे ग्रामीण भागातून भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा लाभत आहे. योजनांचा थेट लाभ महिला वर्गाला मिळत असल्याने बचत गटांच्या महिला भाजपात सामील होत आहेत महिलांचा सक्रिय सहभाग हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष एड किशोर देशमुख यांनी याप्रसंगी केले असून किनवट माहूर मतदार संघाला दूरदृष्टी नेता लाभला आहे कमी वेळेत जास्त जास्तीत जास्त विकास कसा साधावा याचे कौशल्य फक्त आमदार भीमराव केराम यांच्याकडेच आहे अशा शब्दात त्यांनी आ केराम यांच्या विकास कामांची प्रशंसा केली आहे. आमदार झाल्यानंतर दोन वर्षे कोरोना काळात गेली तर एक वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागले राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठीने माझी विकासकामांची प्रत्येक मागणी प्राधान्याने मान्य करून तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच मी किनवटच्या विकासाला चालना देऊ शकलो. हा विकासाचा ओघ खंडित होऊ देणार नाही. सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे असे स्पष्ट करत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन आ भीमराव केराम यांनी याप्रसंगी बोलताना केले आहे.तर लवकरच पाच हजार महिलांचा भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे लक्ष्मण बेहरे यांनी सांगितले आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ओबीसी आघाडीचे माजी नांदेड जिल्हा अध्यक्ष बाबुराव केंद्रे,मा. गोविंद अकुरवाड, तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार,माहूरचे तालुका अध्यक्ष श्रीकांत राव घोडेकर,मा.आनंद मच्छेवार माजी नगर अध्यक्ष न.पा.माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार भगवान हूरदुखे,बबलू जाधव विवेक केंद्रे,उद्धवराव मुंडे, रामदास गुट्टे,विष्णू दराडे अनिल वाघमारे गोपू महामुने अशोक जाधव आंबाडीकर शेंदूपान मुनेश्वर वसंत राठोड उमाकांत कराळे दयानंद दराडे माधव डोकळे शेषराव पाटील, विष्णू राठोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले सर्वच कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईकला हा धक्का असल्याचे बोलले जात आहे