किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्ताने सीटू कार्यालयात शहिद क्रांतिकारकांना अभिवादन !

नांदेड – एक मे दिना निमित्ताने सीटू कार्यालयात शहीद स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला.
कोविड – १९ काळात निधन झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात निरपराध लोकांना भावपूर्ण आदरांजली वाहून शहीद क्रांतिकारी वीर जवानांना अभिवादन करण्यात आले.
तसेच सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांना निवेदन देऊन राज्य,केंद्र व स्थानिक पातळीवरील मागण्याचे निवेदन देण्यात आले असल्याचे सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
आयकर न भरणा-या प्रत्येक व्यक्तीस दरमहा किमान ७५०० रूपये सरकारने केरळच्या धर्तीवर सुरू करावेत.रेशन मोफत देऊन त्या मध्ये मीठ,मीरची,गॕस,गहू,तांदूळ,डाळीसह इतर १६ जीवणावश्यक वस्तूचा पुरवठा करावा.आशा व गट प्रवर्तक ताईंना कोवीड भत्ता स्वरूपात प्रतिदिन ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता सुरू करावा.नांदेड रेल्वे स्टेशन सफाईदार कामगारांच्या ॲटॉसीटी प्रकरणातील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू आणि एस.के.वल्ली यांचे एफआयआर मधील नावे दोषारोप पत्रात समाविष्ट करून तत्कालीन तपास अधिकारी उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.नांदेड स्वारातीम विद्यापीठातील टेंडर समाप्त झालेल्या वादग्रस्त सीआयएसबी व गोदावरी एन्टरप्रायजेस सफाई कामगार पुरवठा करणाऱ्या कंपनीस काळ्या यादीत टाकून तातडीने सर्व सफाई कामगारांना कामगार कायदा कलम दहा प्रमाणे कायम करावे.श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सीटू जिल्हा समितीच्या वतीने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत आपल्या कार्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आलाआहे.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सीटू जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.शेख मगदूम पाशा,कॉ.दत्तोपंत इंगळे,कॉ.लत्ता गायकवाड,कॉ.छायाताई निळकंठे आदींची होती.

134 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.