तहसिल कार्यालय किनवट येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे….”
“झाडे लावा,पर्यावरणाचा समतोल राखा”
किनवट : येथील तहसिल कार्यालय परिसरात जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने आमदार भीमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तीकिरण एच.पुजार (भाप्रसे ) यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी प्रभारी तहसीलदार अनिता कोलगणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे आदी मान्यवरांसह महसूल व वन विभागातील सर्व अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यातील विविध कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
93 Views