आस फाउंडेशन च्या वतीने पुलावभात व (उपवास) एकदशी असलेल्या करीता 20 डझन केळी वाटप
परभणी: दिनांक :- 07 जानेवारी 2024 रवीवार रोजी कै.सरस्वतीबाई आबासाहेब देशमुख तिथी नुसार मासिक शासकीय स्त्री रुग्णालय परभणी येथील पेशन्ट नातेवाईकांना 500 प्लेट पुलावभात व (उपवास ) एकदशी असलेल्या करीता 20 डझन केळी वाटप करण्यात आले.
*कै.सरस्वतीबाई आबासाहेब देशमुख यांचे मासिक सामाजीक परंपरेच्या जागी थोड़े वेगळे करण्याचे ठरवले आसुन सपुर्ण 12 महीने हे सरकारी हॉस्टपीटल मधील पेशन्ट नातेवाईकांना करीता वाटप करण्याचे ठरवले आहे.
येथील भरपुर पेशन्ट नातेवाईकांचे डब्बे खेडे गावातुन आचानक रद्द होतात वा येत नाहीत व नवीन स्त्री रुग्णालय परीसरात आजुन हॉटेल सुवीधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे याची येथे खुप गरज आहे
*याप्रसंगी उद्धवराव देशमुख म्हणाले की,आमचे धैय आहे की , अन्ना विना कोणीही उपाशी झोपु नये, शिक्षणा पासुन कोणीही वंचीत राहु नये.आम्ही अन्नछत्र ही सेवा मागील 7 वर्षा पुर्वी सुरु केले व आज सर्वांचे सहकार्याने तसेच आमचे “आस” फांउडेशन, we care foundation, लायन्स क्लब प्रिन्स परभणी यांचे सौजन्याने नित्यनियमित चालु आहे.