केरामच्या मध्यस्थीने मौजे नागझरी येथिल तलावातील मच्छीमारांचा व कंत्राटदारांचा विकोपाला गेलेला वाद अखेर निवळला.
किनवट(आनंद भालेराव)
दि ११ आ.भिमराव केराम यांच्या मध्यस्तीने सामंजस्य घडवुन आणल्याने किनवट तालुक्यातील मौजे नागझरी येथिल तलावातील मच्छीमारांचा व कंत्राटदारांचा विकोपाला गेलेला वाद अखेर निवळल्याने दोन्ही बाजुच्या प्रतिनिधींनी आ. भिमराव केराम यांचे मनपासुन आभार मानले आहे.
किनवट तालुक्यातील मौजे नागझरी या तलावातुन किनवट शहरातील व परिसरातील मच्छीमार हे गेल्या अनेक वर्षापासुन मच्छीमारी करुन आपले उदर्निवाह करतात, मच्छीमारी करण्याकरिता शासकीय कंत्राट प्रक्रीया राबविण्यात येते ज्याव्दारे शासनाला महसुल प्राप्त होतो. तरी मच्छीमारांची संस्था हा कंत्राट मागील अनेक वर्षापासुन शासनांकडुन रितसर घेते परंतु मागील वर्षी च्या कोरोना विषाणुच्या परिस्थिती मुळे व मच्छीमारी करणा-यांच्या अज्ञानामुळे निविदा प्रक्रीया केव्हा पार पडली हे नियमित मच्छीमारांना लक्षात न आल्याने ती निविदा किनवट तालुक्यातील मांडवी येथिल एका संस्थेला प्राप्त झाली. आता ती निविदा इतर संस्थेला प्राप्त झाल्याने नागझरी येथिल तलावातुन मच्छीमारी करण्याच्या कारणाने दोन्ही पक्षातील व्यक्ती आमने सामने उभे राहिले व त्यातुन मोठा वाद निर्माण होत होता तर तवाण सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शेवटी पावसाळी अधिवेशनातुन परतल्या नंतर आ. भिमराव केराम यांनी दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दोन्ही बाजुतील व्यंक्तीचे नुकसान होणार नाही व दोन्ही बाजुचे एका मतावर ठाम राहतील अशा फॉर्मुला त्यांच्यात निश्चित केल्याने दोन्ही बाजुच्या व्यक्तींनी यावर मंजुरी दिल्याने त्यांच्या समेट घडुन आले.
घडुन आलेल्या या समेटामुळे किनवट शहरासह परिसरातील मच्छीमारांना नागझरी तलावातुन मासेमारी करता येणार आहे व त्याव्दारे त्यांच्या कुटुंबाचे उदरभरण ही त्यांना करता येणार असल्याने त्यांनी आ.केराम यांचे आभार मानले आहे. तर निविदा प्राप्त झालेल्या संस्थेला देखिल यात फायदा होणार असल्याने त्यांनी देखिल आ.केराम यांच्या मध्यस्थीवर समाधान व्यक्त केले आहे.
याकरिता आ. भिमराव केराम यांच्या सह भाजपा नेते अनिल तिरमनवार , नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, शेख नझिर बाबा भाई, सोखी , विक्कि कोल्हे यांच्यासह दोन्ही पक्षातील अनेक प्रतिनिधींनी समन्वय साधुन आणले.