मातंग समाजातील नवनिर्मीतीसाठी युवकांनी पुढे येणे काळजी गरज –मास संघटनेचे अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी
देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील वलाडी येथे दि १०/७/२१ शनिवार मांतग अस्मिता संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी वलाडी येथे बोलताना मातंग समाजाच्या नवनिर्मीतीसाठी समाजाच्या युवकांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे असे मत मास मांतग अस्मिता संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी मातंग समाजाची दिशा व दशा या विषयावर बोलताना व्यक्त केले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती सत्यवान कांबळे हे होते या कार्यक्रमाचे सुरुवात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सर्व पदाधिकारीच्या उपस्थित माहामानव यांना अभिवादन करण्यात आले , तसेच संघटनेचे वतीने माजी सभापती सत्यवान कांबळे यांचे वाढदिवस व गोकुळ दतंराव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष देऊन मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते त्या दोघांना सत्कार सन्मानीत करण्यात आले, यावेळी गोकुळ दतंराव संपर्क प्रमुख, समाजाचे नेते रतन सुर्यवंशी, उध्दव गायकवाड संरपच, ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, उध्दव शिंदे, उध्दव गायकवाड, महादेव डावरे, रवि सुर्यवंशी, शिवाजी सुर्यवंशी, विठ्ठल लोंढे, अविनाश गायकवाड, राजु कांबळे, अमोल गायकवाड, दत्ता सुर्यवंशी, पवण सुर्यवंशी, गंगाधर सुर्यवंशी, लक्ष्मण तुकाराम रणदिवे, प्रसाद सुर्यवंशी, वसंत वाघमारे, संजय गायकवाड, संदीप वाघमारे, भगवान गायकवाड, गुणवंत मोहिते, आदिची उपस्थितीत होते, अनोखा उपक्रम म्हणजे मांतग अस्मिता संघर्ष सेनेचे कार्यकारिणी या बैठकीत करण्यात आले लातूर जिल्हाध्यक्षपदी मा. सभापती सत्यवान एकनाथ कांबळे, तर देवणीतालुकाध्यक्षपदी विकास गायकवाड वलांडीकर, जिल्हा प्रवक्ता रतन सुर्यवंशी, जिल्हाप्रसीध्दी प्रमुख रणदिवे लक्ष्मण आदिची एक मतांनी निवड करण्यात आली या बैठकीचे सुत्रसंचालन रतन सुर्यवंशी, आभार रणदिवे लक्ष्मण यांनी मांडले, देवणी तालुक्यातील मांतग समातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,