पोलीस महानिरीक्षकांकडून सपोनि महादेव पुरी यांचा सन्मान
नरसी:नरसी सर्कल प्रतिनिधी ( मारोती सूर्यवंशी)
मागच्या आठवड्यात नायगाव तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी शेतकरी व्यापारी व सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले तालुक्यात कुठेही जीवित हानी मात्र झाली नाही. याच अतिवृष्टीच्या दिवशी सकाळी कुंटूर रस्त्यावर असलेल्या नाल्याला अचानक पूर आला मात्र या आलेल्या पुरात कुंटूर येथील भिवाजी संभाजी झुंझारे हा इसम अडकला त्याने या पुरात नाल्यात असलेल्या एका झाडाचा आसरा घेतला. कुंटूर नाल्याला आलेल्या पुरात एक इसम अडकल्याचे कळतच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी पूर आलेल्या नाल्याकडे धाव घेतली महसूल प्रशासना सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यांची माहिती देऊन पुरात आडकलेल्या बाहेर काढण्यासाठी ह्या दबंग ,धाडशी अधिकाऱ्याने
आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः पुरात उडी घेतली आणि गावाकऱ्यांच्या मदतीने व होडी मागवून त्यास सुरक्षित बाहेर काढले. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात कुंटूर ठाण्याच्या सपोनि महादेव पुरी यांना यश आले. त्यांच्या कृतुट्वाचे सर्वत्र स्वागत कौतुक होत असताना त्यांच्या या धडासा बाबत नांदेड परीक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या कार्यालयात त्यांच्या या धाडसचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.