विश्वासू प्रवासी संघटनेचे कार्य प्रशंसनीय ः शेखर चन्ने एस.टी.महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी केली नांदेड बसस्थानकाची पाहणी
नांदेड, दि. 3 ः एस.टी. महामंडळाचे कार्यकारी संचालक शेखर चन्ने हे नांदेड दौ-यावर आले असून या दरम्यान त्यांनी बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर विश्वासू प्रवासी संघटनेच्या कामाची प्रशंसा केली.
यावेळी उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद, प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी बद्रीप्रसाद मांटे, विभाग नियंत्रक दत्तात्रय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वासू प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी 9 वाजता फ्लोरन्स हाॅटेल येथे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सहसचिव रमाकांत घोणसीकर इजिं.हरजिंदर सिंघ संधू कार्यालयीन प्रमुख आदींचा समावेश होता. यानिमित्ताने व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी बसस्थानकातील होत असलेल्या कार्याचे कौतूक करत विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर व संघटनेचे कौतूक केले व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला यानंतर विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने प्रशासनाला मागण्याही करण्यात आल्या. यात प्रामुख्याने बसस्थानकात प्रवाश्यांना पद्धतशीरपणे बसमध्ये चढता-उतरता यावे यासाठी क्यू पद्धतीची रचना करण्यात यावी, बसस्थानकातील साफसफाई करण्यासाठी कर्मचा-यांच्या संख्येत वाढ करावी तसेच बसस्थानकातील वाढत्या चो-या लक्षात घेऊन तेथे दोन महिला व दोन पुरूष पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची दखल घेत संबंधित अधिका-यांना शेखर चन्ने यांनी याबाबत सूचना केल्या.