आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती अभियानाची बैठक चिखली येथे संपन्न
जिवती – दि 04/05/23 ला मौजा चिखली खुर्द येथे आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.डॉ अंकुश गोतावले सामाजिक कार्यकर्ते तथा उपनगराध्यक्ष न प जिवती यांच्या नेतृत्वात आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती अभियान सुरु असून त्याची तिसरी सभा चिखली खुर्द येथे घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री संग्राम ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ता तोगरे साहेब,श्री दीपक गोतावळे सर, श्री भानुदास बटवाडे, श्री केदासे पोलीस पाटील हे उपस्थित होते.गायकवाड माजी पोलीस पाटील हे होते.
याप्रसंगी श्री दत्ता तोगरे, श्री दीपक गोतावळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ गोतावळे यांनी आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मा. अंबादास कंचकटले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोविंद दुबले यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री चंद्रभान केदासे, श्री दीपक ढगे, डॉ चरण केदासे, श्री सूर्यवंशी, श्री दुईले, श्री दुबले, श्री गोपले, श्री कंचकटले तसेच महिला आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.बैठकीसाठी गावातील सर्व युवा वर्गाने परिश्रम केले.