कुसुम महोत्सवाच्या मराठमोळी फॅशन शोतुन नवीन पिढीला संस्कृतीची ओळख
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२.महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या कुसुम महोत्सवाने सांस्कृतिक मनोरंजनात्मक मेजवाणी देत गुरुवारी मराठमोळी फॅशन शोतुन नवीन पिढीला संस्कृतीची ओळख करून दिली यावेळी स्पर्धकांनी मराठमोळी वेशभूषांमधून अस्सल महाराष्ट्रीयनचे उपस्थितांना दर्शन घडवले आहे.पूर्ण सोहळ्यात टाळ्यांच्या कडकडाटात महोत्सवाचे ग्रॅन्ड सक्सेस अधोरेखित होत होते.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर न. १ म्हणत रसिकांनी घरची वाट पकडली.देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून तर कु. श्रीजया चव्हाण,कु.सुजया चव्हाणसह सर्वच टीमच्या परिश्रमातून येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावरआयोजित करण्यात आलेल्या कुसुम महोत्सवास दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला परंपरा गौरवाची मराठी वेशभूषेची अशी टॅग लाईन असलेल्या शोतुन नांदेडकर महिलांना ही मराठमोळी फॅशनमध्ये झळकण्याची संधी मिळाली होती.
यावेळी मधुरा वेलणकर,योगेश सोहनी,अनुश्री फडणीस,डाॅ.सान्वी जेठवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व मुली सक्षम व्हाव्यात यासाठी शिक्षण, प्रशिक्षण तसेच लघु उद्योग करणा-या महिलांना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच महिलांच्या कलागुणाला वाव देत नांदेकरांसाठी सांस्कृतिक मनोरंजनात्मक मेजवाणी देणाऱ्या गुरुवारच्या मराठमोळी फॅशन शो ने महोत्सवाला चार चाँद लावल्याचे दिसून आले.
मराठमोळी, मस्तानी,कोल्हापुरी यांसारखे नऊवारीचे विविध प्रकार, सहावारी साड्या,महाराष्ट्रीयन अलंकार असा पोशाख परिधान करून करून पाश्चत्य संस्कृतीतून अंगावर तोकडे कपडे घालण्याच्या फॅशनवर मराठमोळी फॅशन शोतुन अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले होते.
उत्कृष्ट नियोजन,ग्रॅन्ड प्रतिसादातून कुसुम महोत्सव न. १ठरल्याची भावना रसिकातून व्यक्त करण्यात येत आहे.