छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वोत्तम राजा म्हणून गौरव होतो-प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे
नांदेड दि. 2 –
उदात, व्यापक ध्येय, शेतकर्यांविषयी धोरण, नियोजन, ध्येयावर अढळ निष्ठा, समर्पण, निर्णयकौशल्य, संघटन कौशल्य, धाडस, संयम, विलक्षण, कष्ट, संघर्ष करताना, लढा देताना, आईवडिलांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि निष्ठावान कर्तबगार मावळ्यांच्या बळावर शेकडो वर्षांचा गुलामीचा इतिहास पुसून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे क्रांतिकारक कार्य केले. सर्वोत्तम राजा म्हणून आजही त्यांचा गौरव होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले. अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त सर्वोत्तम राजा शिवछत्रपती याविषयावर आयोजित जाहीर व्याख्यान देताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे निळकंठराव मदने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक कपिल आगलावे, माजी सरपंच मारोतराव देशमुख, बाबूराव साबळे, पो.पा. सुधाकरराव देशमुख, ह.भ.प. बाबूराव भांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.हनुमंत भोपाळे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचा, सहकार्यांचा व सैन्याचा विश्वास संपादन केला होता. स्वराज्य हे जनकल्याणासाठी उभे राहत आहे. शिवाजी महाराज हे कल्याणकारी आपले राजे आहेत ही भावना जनतेत दृढ करण्यात महाराज यशस्वी झाले होते. त्यामुळे स्वराज्य व शिवाजी महाराजांसाठी जीव देण्यासाठी अनेकजण तयार झाले. त्यामुळे संख्या बळ कमी असताना स्वराज्य निर्माण करण्याच्या कामी मोठी मदत झाली. संघर्ष करताना लढा देताना पुढे जात असताना वेळप्रसंगी दोन पावलं मागेही आले पाहिजे अन् पुन्हा यशासाठी सिध्द झाले पाहिजे हा बोध शिवचरित्रातून मिळतो. शिवचरित्र म्हणजे व्यक्तिमत्व विकसित करणारा महान ग्रंथ आहे, त्यामुळे सर्वांनी शिवचरित्र समजून घेतले पाहिजे, असे आवाहन डॉ. भोपाळे यांनी केले.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणार्या अशोक जाधव व केवळाजी ठोंबरे व उत्कृष्ट भाषण करणार्या लहान मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मदाने यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.संतोष हापगुंडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.विनायक सीतापराव, गोविंदराव साबळे, मारोतराव भांगे, शकुराव हापगुंडे, केवळाजी ठोंबरे, शंकरराव मरकुंदे, भिमराव मरकुंदे, श्याम गीरी, गजानन हापगुंडे, अरुण देशमुख, शामराव मरकुंदे, शेख गुलाब, सुधाकर हापगुंडे, नवनाथ हापगुंडे, बाळासाहेब कांबळे, नवनाथ मदने, मारोती हापगुंडे, बाळू हापगुंडे, शिवराज बंडाळे, राम कल्याणकर, ठोंबरे यांच्यासह परिसरातील श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.
–