वंचित बहुजन आघाडी महिला तालुका कार्यकारणी गठीत करण्याच्या अनुषंगाने चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कौशल्याबाई रणवीर, जिल्हा प्रभारी निरंजनाताई आवटे, नांदेड शहाराध्यक्षा चंद्रकलाताई चापलकर, रेखाताई ढोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी महिला तालुका कार्यकारणी गठीत करण्याच्या अनुषंगाने चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला तालुकाध्यक्ष किशन राठोड महासचिव विलास भालेराव तालुका सचिव राहुल कापसे ज्येष्ठ नेते दत्ताजी गडलवाड देवरावजी सोनकांबळे युवा नेते दया पाटील अजित खान पठाण आदित्य भवरे दत्ता भालेराव सम्राट कावळे महेंद्र वासाटे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद चन्द्र विमलताई पांडे वंदना कोकाटे अनिता मंगाम संगीता कपाटे जयश्री नालावार संगीता साकपेलीवार कल्पना मुनेश्वर महानंदा कांबळे वैशाली नगारे शांताबाई मुनेश्वर यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या