किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ग्रामपंचायत दिग्रस-चंद्रपूर च्या सरपंच पदी श्रावण मिराशे तर उपसरपंचपदी नर्मदाबाई साबळे यांची बिनविरोध निवड

किनवट – प्रतिनिधी:
तालुक्यातील दिग्रस चंद्रपुर गट ग्रामपंचाय मध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल कडुन विजयी झालेल्या श्रावण मिराशे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी नर्मदाबाई साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन योग्य व्यक्तींची गावकारभारी म्हणुन वर्णी लागल्याने गावात आनंदाचे भरते आहे.
किनवट तालुक्यात यावेळी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भल्या भल्यांना धूळ चारली अनेक ठिकाणी नवख्या अल्पवयीन उमेदवारांना मतदारांनी पसंती दर्शवली, काही ठिकाणी दिग्गजांचा पराभव करत गावगाड्याचत अनुभवलेल्यांना डावलत सुज्ञ सुशिक्षित तरुण ग्रामस्थांनी राजकीय गणितांचा गुंता सोडवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. नेहमीच्या गाव पुढार्यांचा अनुभव घेवुन कदरलेले सुशिक्षित तरुण या अवघड असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक रिंगणात लढायला उतरली आणि जिंकलीही.

देशाच्या विकासाचा पाया हा ग्रामीण भागातूनच भक्कम केला जातो अस म्हणतात, त्यातच देशाची खरी ताकद तरूण जबाबदारीने भूमिका निभावतो. शासन-प्रशासन ज्या लोकहितासाठी योजना आखते मंजूर करते त्याची प्रभावपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत सुशिक्षित उमेदवार गेले पाहिजे.
अगदी याच पध्दतीने दिग्रस गट ग्रामपंचायतीत चंद्रपूर, गोणखेडा, बामन तांडा, अशा चार छोट्या गावांचा समावेश आहे, या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवीन चेहर्यांना जनतेने संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पॅनल प्रमुख पदाची जबाबदारी खासदार मा. हेमंतभाऊ पाटील यांचे दिल्ली येथिल स्वीय सहाय्यक कर्तार साबळे, माजी उपसरपंच बाळू पवार, यांनी जबाबदारी शिरावर घेवुन चोखपने पार पाडली थेट जनतेतुन सरपंचासह एकुण सात उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आणले, ग्रामविकास पॅनल ने एक हाती सत्ता प्राप्त केली असून पहिल्यांदाच सक्रिय राजकारणात सहभागी झालेले कर्तार साबळे यांच्या विजयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनतेमधून थेट सरपंचपदी श्रावण मिराशे उपसरपंच पदी श्रीमती.नर्मदाबाई देवीसिंग साबळे यांची सदस्य पदी रेणुकाबाई गव्हाणे, शांताबाई गादेवाड, मारुती झळके, रुखमाबाई वायकोळे, राजेश गादेवाड यांची निवड झाली आहे. निडुन आलेल्या सर्व उमेदवारांच खासदार हेमंत पाटिल , आमदार भिमराव केराम, गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटिल, यांनी अभिनंदन केले.
ग्रामपंचायत निवडणुक दरम्यान ग्रामविकास पॅनलचे पदाधिकारी बाळू पवार, कर्तार साबळे, अजीत गुलाबसिंग साबळे, रामराव कातले, कचरू आढाव, मनोहर मडावी, देवु साबळे, भगवान बामन, नयन साबळे, अवधूत पाटील, शिवाजी जाधव, गुरु साबळे, माधव गीते, प्रेमसिंग साबळे, मधुकर कदम, बाळू कदम, शंकर जाधव, मारोती कवडे, नामदेव कदम, अंबादास शिंदे, अमरू साबळे, रमेश पडवाळ, भगवान पडवाळ, ईश्वर साबळे, नारायण पडवाळ, प्रदीप साबळे, धनराज साबळे, नागेश सूर्यभान, यांच्यासह सर्व गावकर्यांनी सहकार्य केले.

105 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.