किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विविध सण व उत्सव एकोप्याने साजरा करण्याचा निर्धार – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर* जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न *कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करणार

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.8. जिल्यात येत्या एक महिन्याच्या कालावधीत श्रीराम नवमी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,गुड फ्रायडे,हनुमान जयंती,महाराष्ट्र दिन,समजान ईद,अक्षय तृतीया आणि बुध्द पौर्णिमा हे महत्वाचे सण आणि उत्सव जिल्हाभरात साजरे होणार आहेत. सर्व धर्मियांमधील परस्पर सहकार्य, सहिष्णुता,एकोपा हा आजवर सर्वांनी जपला आहे. कोविड काळातही आपल्या जिल्ह्याने मानवतेचे अनोखे दर्शन देवून एकमेकांची सेवा केली आहे.

या एकात्मतेच्या भक्कम पायावर येत्या महिन्यातील सर्व धार्मिक उत्सव व जयंती नांदेड जिल्हावासिय तेवढ्याच समजुतदारपणे उत्साहात साजरे करतील,असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस महापौर जयश्री पावडे,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, तहसिलदार किरण अंबेकर तसेच पोलीस विभागातील अधिकारी व सर्व धर्मियांचे शांतता समितीचे सदस्य व जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.

उत्सवाचे महत्व हे अनन्य साधारण आहे. गत दोन वर्षापेक्षा अधिकचा काळ हा नागरिकांनी कोरोनाच्या सावटाखाली असूनही अत्यंत संयमाने व जबाबदारीने पूर्ण केला आहे. हेच जबाबदारीचे भान येत्या काळातही नांदेडकर जपतील.उत्सव साजरा करताना अधिकाधिक मानवतेच्या जवळ जात सध्या गरजेच्या असलेल्या रक्तदानाच्या चळवळीत स्वयंस्फूर्त सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. रक्तदान शिबिर सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल.रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बाईक रॅली व इतर रॅलीपेक्षा जिल्ह्याच्या विविध रक्तपेढ्यामध्ये रक्ताची कमतरता भासणार नाही यादृष्टीने रक्तदान शिबिर अधिक सहाय्यभूत ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

रॅलीच्या आयोजनात नादुरुस्त असलेली वाहने क्वचित प्रसंगी अधिक धोक्याची ठरु शकतात. त्यामूळे जी काही वाहने यासाठी वापरली जातील ती सुस्थितीत असणे आवश्यक आहे.येवढेच नव्हे तर त्या-त्या वाहनाची अगोदर तपासणी करुन संबंधित यंत्रणेचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल असे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. हे सर्व सण-उत्सव साजरे करताना प्रत्येकाने आपली विधायक भूमिका जपली पाहिजे.कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असून त्यांचे प्रत्येकांने पालन करणे अधिक महत्वाचे आहे असे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

नांदेडकर ही आपली सहिष्णुतेची भूमिका जपतील याच बरोबर सर्वधर्मसमभाव ही भूमिका जपत एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावतील.प्रशासनातर्फे आवश्यक असलेल्या सूचना वेळोवेळी निर्गमित केल्या जातील.त्या सूचनांचे सर्वांनी पालन केले पाहीजे असे महापौर जयश्री पावडे यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लक्षात घेता पर्यावरणाला व रस्ते वाहतूकीस बाधा पोहचविणाऱ्या बॅनर,बाइक रॅली व डीजे यांच्या वापरासाठी कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.

110 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.