*टी.एस.क्षीरसागर यांच्या “गावरान बोरं ” या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन, पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने वर्ष २०२१-२२ साठीचा टी. एस क्षीरसागर लिखीत “गावरान बोरं ” या पहिल्याच काव्यसंग्रहास ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार सन्मानपूर्वक संत ज्ञानेश्वर सभागृह,पुणे विद्यापीठ,पुणे येथे प्रदान करण्यात आला.
भारताचे माजी गृहमंत्री मा ना सुशिलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे झाले होते.
सदर काव्यसंग्रहास प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे पुणे यांची लाभली आहे. या पुस्तकाचे प्रकाशक सचिन चांदणे व अक्षरजुळणी जाधव यांची यांची आहे.
श्री टी एस क्षीरसागर यांच्या या काव्यसंग्रहात प्रबोधनात्मक कविता आहेत, यात ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्यात आला आला आहे. समाजातील वाईट, चाली रीती, अंधश्रद्धा यावर टिकात्मक विवेचन केलेले आहे.
लेखकाचे मनोगत -माझ्या पहिल्याच साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार मी माझ्या दिवंगत आई -वडिलाना अर्पण करतो. रसिक वाचकांचे प्रेम सदैव पाठीशी राहील हीच एक अपेक्षा. धन्यवाद
सदर पुरस्कार थोर विवेकवादी विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल्लनाचे माजी अध्यक्ष मा.डॉ.श्रीपाल सबनीस,पद्मश्री मा. नामदेव काबळे,पद्मश्री मा.गिरीश प्रभुणे, कुलगुरू मा.डॉ. नितीन करमळकर,विद्यापीठ व्यवस्थापन समीती सदस्य मा. राजेश पांडे, प्रोग्रेसीव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. गजानन एकबोटे, अण्णाभाऊ साठे अध्यासन चे समन्वयक मा. सुनिल भडंगे व कार्याध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांचे शुभ हस्ते देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र अनेक लेखक, कवी यांचा सन्मान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप शाल,सन्मानचिन्ह,व सन्मानपत्र असे होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जि.प.केंद्र शाळा सुरतगांव व केंद्र सुरतगांव शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी श्री टी एस क्षीरसागर यांचे खुप खुप कौतूक व अभिनंदन केले आहे.