ओबीसी जागर अभियान नियोजन बैठक संपन्न
नांदेड: नांदेड महानगर जिल्हा व ग्रामीण भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक दिनांक 5/10/2021 रोजी सकाळी अकरा वाजता मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री प्रवीणभाऊ साले तसेच ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री प्रदीपजी तांदळे, ओबीसी जागर अभियान प्रमुख व माजी उपमहापौर लातूर मा. श्री देवीदासजी काळे, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री माधवअण्णा साठे, मराठवाडा महीला संपर्क प्रमुख सौ. रजनीताई पाटील यांनी जागर अभियानाबाबत मार्गदर्शन केले. भाजपा ओबीसी मोर्चा नांदेड महानगर चे जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटेश जिंदम यांनी प्रास्ताविक केले. तर भाजपा ओबीसी मोर्चा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष श्री बाबुराव केंद्रे यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी सर्वश्री भाजपा ग्रामीणचे सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधव उच्चेकर, ओबीसी मोर्चा मराठवाडा सहसपंर्क प्रमुख विनायकजी सगर, किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, आबारावजी संगनोड जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा ग्रामीण चे अध्यक्षा सौ. चित्रलेखा गोरे,ओबीसी मोर्चा महीला अध्यक्षा सौ. अर्चना बरगले, महादेवी मठपती,शिवराणी हंगरगे, सुलोचना स्वामी,राधीका पटवारी,भाजपा सरचिटणीस अशोक पाटील धनेगांवकर, भाजपा उपाध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण, बागड्या यादव, अनिल हजारी, रमेश गटलेवार, शंकर वानेगांवकर, प्रशांत रत्नपारखी, नरेश यन्नावार, नितीन बोड्डेवार, मारुती शिवरकर, हरिदत्त टाळे, बालाजी धोत्रे, शिवा क्यातमवर, संतोष पवार, बंडू कदम, संतोष औंढेकर, सुभाष राठोड, शंकर चिंचोळकर, शिवरानी हंगरगे, मेघा स्वामी, दिपाली सोनटक्के, शीला रेनके, सीमा हरडे, शारजाबाई दंतलवाड, आनंदराव सोळुंके, अमोल कुलथीया, राधिका पटवारी, दैवशाला गुडवळे, श्रीरंग गुटे, बी. आर. चीलवरवार, श्याम नाईक, गंगाधर रावणपल्ले, हनुमंत गणे, शिवकांत माळगे, गंगाधर दोसलवार, संतोष सोनटक्के इत्यादी व इतर ओबीसी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.