किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मौजे घोटी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज घोटी गावामध्ये किमान 5 वर्षाच्या नंतर कायदेविषयक शिबिर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती अंभोरे साहेब तसेच सहाय्यक न्यायमूर्ती परवरे साहेब यांनी कायदेविषयक माहिती दिली गावातील लोकांच्या सहाय्याने कार्यक्रम साजरा झाला..
2 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती अंभोरे साहेब तसेच सहाय्यक न्यायमूर्ती परवरे साहेब तथा अभी वक्ता संघाचे अनेक सदस्य तसेच किनवटचे प्रतिष्ठित नागरिक तथा माजी नगराध्यक्ष के मूर्ती साहेब आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमांमध्ये विधी विषयक ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून ॲड. काळे साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावित केले त्यांनी पवित्र “साध्य” मिळवायचे असेल तर “साधन” ही तसेच पवित्र असायला पाहिजे या बाबी बद्दल मार्गदर्शन केले.तसेच ॲड.सूर्यवंशी (शामिले)यांनी शेती विषयक कायद्याबद्दल त्यामध्ये “महसुली कायदे” या विषयी मार्गदर्शन केले तसेच ग्रामपंचायतीचे कोणते अधिकार असतात याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले तसेच ॲड. पाटील मॅडम यांनी स्त्रीविषयक कायद्या बद्दल सांगितले तदनंतर सहाय्यक न्यायमूर्ती परवरे साहेब यांनी “ग्राम राज्य म्हणजेच रामराज्य” या दृष्टिकोनातून प्रखर असे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य न्यायमूर्ती यांनी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या विषयाला अनुसरून अध्यात्मिक बाबतीतुन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अभियोक्ता संघाचे सदस्य ॲड. काळे साहेब ,ॲड.सोनकांबळे साहेब ॲड. येरेकर साहेब , ॲड.टेकसिंघ चव्हाण साहेब, ॲड.सर्पे साहेब ॲड. दिव्या पाटील मॅडम, ॲड शामीले साहेब, न्यायालयीन कर्मचारी मिसलवार साहेब (वरिष्ठ लिपिक), जुबेर खान पठाण (न्यायालयीन सेवक) ग्राम विस्तार अधिकारी प्रशासक घुमटकर, ग्रामसेवक अंभोरे साहेब, तसेच ग्रामपंचायत मधील सेवक गंगाधर बेंद्रे, पाणीपुरवठा कर्मचारी श्री कैलास पावडे, संगणक चालक गौतम भवरे पंचायत समिती किनवट येथील वाहन चालक कागने साहेब, महसूल कर्मचारी तलाठी घोटी पांढरे साहेब, गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव सुरोशे, जगदीश गोविंदराव गरड (पाटील), राजू सुरोशे, देवरता मुनेश्वर, गणपत पाटील, सिद्धार्थ भवरे, रामदास प्रधान, पांडुरंग खरे, अभिजीत गरड, चंद्रशेखर गरड, सतीश गरड, किशोर चटलेवार,
मारुती रमेश गरड, वचना सातपुते (माजी सरपंच), प्रभाकर मगर,
आदी मान्यवरांच्या उपस्थित कायदेविषयक शिबिर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.

704 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.