देगलूर शहरातील अतिक्रमण हटविणार १५ दिवसांचा अल्टिमेटम…कारवाईसाठी संयुक्त पथक
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.17. जिल्यातील देगलूर शहरातील नगर परिषद हद्दीतील नांदेड-हैदराबाद रोड व देगलूर-उदगीर रोडसहित शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील रहदारीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्यासाठी एका संयुक्त पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकास १५ दिवसांच्या आत कारवाई पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून दिले आहेत.
यानंतर सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी आपला मोर्चा शहरातील अतिक्रमणाकडे वळविला.पालिका प्रशासनास लेखी पत्र देऊन शहरातील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले असता खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने सार्वजनिक धडक कारवाईने वाळू माफिया भूमिगत
आयएएस असलेल्या सौम्या शर्मा यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून देगलूरचा पदभार स्वीकारताच तालुक्यात वाळूमाफियांकडून सुरू असलेल्या हैदोसावर लगाम लावीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या आठ हायवा ट्रकवरती कारवाईचा बडगा उगारला होता व अनेक ठिकाणी महसूलचे बैठे पथक निर्माण करून तपासणी नाके उभारण्यात आले होते. त्यामुळे अनेक वाळूमाफिया हे भूमिगत झाले होते.
बांधकाम विभाग पोलीस ठाणे व नगर परिषद देगलूर यांचे अधिकारी व कर्मचारी सोबतीला घेऊन एक संयुक्त पथक नेमले.
या पथकाच्या माध्यमातून शहरातील देगलूर महाविद्यालयापासून ते जुना बसस्थानकमार्गे मदनूर नाक्यापर्यंत व महाराष्ट्र आरटीओ ऑफिसपासून ते पेट्रोल पंप मार्ग नवीन बसस्थानकापर्यंत असलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील अतिक्रमण हे
सात दिवसांच्या आत काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर संयुक्त पथकाने १५ दिवसांच्या आत सदरील अतिक्रमण काढून टाकण्यात यावे,असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी.नाईक व देगलूरचे पोलीस निरीक्षक एस. माछरे व देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एम.इरलोड यांच्या पथकाला नुकतेच प्राप्त झाले आहे