किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*आंबानगर सांगवी (नांदेड) येथील गादेकर कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपीस तात्काळ अटक करावी व FIR मध्ये ३०७ कलम समाविष्ट करण्यात यावे*. *पिडीत गादेकर परिवार व अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची मागणी*

नांदेड _. नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आंबानगर येथील मातंग समाजातील गादेकर परिवार हा गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी आहेत,याच परिसरात राहणारे लखन जोंधळे, प्रेम जोंधळे आणि त्यांचा सहपरिवार व गुन्हेगार सहकारी यांनी अतिशय किरकोळ कारणावरून भयंकर असा जीवघेणा हल्ला दि.२६ मार्च रोजी सायंकाळी केला. हा हल्ला गादेकर परिवार व कुटुंब हे बेसावध असताना सशस्त्र सामुहिक पणे लाठी,काठी, लोखंडी रॉड, आणि तलवारी ने सामुहिक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.या हल्ल्यात नितीन गंगाराम गादेकर, विठ्ठल गंगाराम गादेकर,सुनिल गंगाराम गादेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.इतर महिला व पुरुष ही हल्ल्यात जखमी झाले आहेत.ही घटना विमानतळ पोलिस स्टेशन अंतर्गत घडली आहे. या घटनेचा FIR होवुन आज रोजी ८ दिवस उलटून गेले तरीही,या हल्यातील आरोपींना अटक करण्याची तत्परता पोलिस यंत्रणेने दाखवली नाही,आरोपी मोकाट, उघडपणे त्याच परिसरात फिरत आहेत.. आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत, अशा सराईत गुंड आरोपींना तातडीने अटक करुन जेरबंद करावे, जेणेकरून आरोपी हे मोकाट उघडपणे फिरणेस पोलिसच एक प्रकारे मुभा देत आहेत, पाठीशी घालीत आहेत,ही भावना बळावणार नाही,याची खबरदारी घ्यावी अशी विनंती पिआय गुरमे साहेब व तपास अधिकारी श्री विनोद साने साहेब यांना करण्यात आली. आरोपीवर 307 गुन्हा दाखल करावा व आरोपीला तात्काळ अटक करावे असे आव्हाण अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे साहेबांनी केले.

409 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.