जनतेला स्वराज्याचे बाळकडू पाजणाऱ्या लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जालना : तालुक्याती डुकरी पिंपरी येथील राजर्षी छञपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी. यांच्या हस्ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पर्पण करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक जिवनावर प्रकाश टाकला व भाषणे दिली.व शाळेतील जेष्ठ शिक्षक मदन.वाय.बी.यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की स्वतंञ लढा आणि केसरी,मराठा सार्वजनिक उत्सव,शिवजयंती,गणेश उत्सव अनेक असे कार्य असे त्यांनी केले.नव्या पिढीला हे कळावे,अशी ओळक आज करून दिली.व तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे.सी.जी.यांनी अध्यक्षीय भाषण केले ते बोलतांना म्हणाले की अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध पेटून उठून आपली ज्वलंत लेखणी आणि विचारांद्वारे जनतेला स्वराज्याचे बाळकडू पाजणारे, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणारे महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज २३ जुलै रोजी जयंती आहे.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. कारण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. आपली वृत्तपत्रे सुरू करताना जी परिस्थिती होती, तिचे राजकीय विश्लेषण करून त्यांनी आपले राजकीय डावपेच ठरवले होते. त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमांचे सुञसंचालन व आभांर प्रदर्शन शाळेचे सहशिक्षिका श्रीमती.देशपांडे यांनी केले.व यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,मदन.वाय.बी.,सोनकांबळे.डी.एन.,नागरे.पी.पी.,श्रीमती.देशपांडे.ए.बी.,जाधव.एल.बी.,ठाकरे.आर.एस.राऊत.एस.बी.,श्रीमती.,खरात.एम.ए. व विद्यार्थांती उपस्थित होते.