समाजभूषण सतीश कावडे यांचा मुखेड येथे सत्कार
मुखेड दि.29 मार्च /
महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनु. जातीतील सामाजिक, शैक्षणिक व इत्तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य /सेवा करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रतिवर्षी दिला जाणारा सन 2022-23 चा वैक्तिक “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल आज मुखेड येथे माजी आमदार अविनाश घाटे यांच्या उपस्थितीत त्यांचेच मुखेड येथील निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे राजकीय जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या शुभहस्ते शाल पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मा. सतीशजी कावडे यांनी आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी जेष्ठ नेते विधितज्ञ ऍड.एन. एम राणवळकर, परमेश्वर बंडेवार,भाजपा नांदेड अनु. जाती अध्यक्ष गंगाधर कावडे, आण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे राज्य सचिव शिवाजी नुरुंदे, मास संघटनेचे नारायण सोमवारे, मा. नगराध्यक्ष गणपत गायकवाड,दलितमित्र महाजन उमरे, वसुर चे सरपंच रमेश शिंदे पाटील, यशवंत शिंदे, हेमंत घाटे, प्राचार्य मनोहर तोटरे, गणपत भुयारे सर,कल्याण पाटील, बाबू पाटील कुंदराळकर मासचे अनिल कावडे,भारतीय लहूजी सेनेचे ऍड. लक्ष्मीकांत दूधकावडे,गजगे आदिसह इतर सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
त्यावेळी भास्करराव पाटील म्हणाले की आम्हीं आमच्या खासदारा मार्फत अ ब क ड चा मुद्दा संसदेत गांभीर्याने मांडू आणि पारित करून घेण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासन दिले.