डॉक्टर अशोक बेलखोडे यांची पुरस्कारासाठी निवड
किनवट/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र आरोग्य मंडळ माळवाडी हडपसर पुणे यांच्या तर्फे आरोग्य शिक्षण व ग्रामीण विकास प्रकल्प या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच डॉक्टर सी.तू. तथा दादा गुजर यांच्या नावाने वैद्यकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस दोन पुरस्कार दिले जातात नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बंजारा बहुल भागात आरोग्य सेवा पुरविण्याचे मोलाचे कार्य डॉक्टर अशोक बेलखोडे हे करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुरस्कार देण्याचे संस्थेच्यावतीने ठरविले आहे.
यात रोख रक्कम 51 हजार, स्मृतिचिन्ह मानपत्र ,शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबद्दल मान्यता देण्या संबंधीचे पत्र डॉक्टर बेलकडे यांना प्राप्त झाले आहे. सदरील पुरस्कार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणार असल्याचे कळविले आहे.