आजकी न्युज चे संपादक नसीर तगाले लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
किनवट (आनंद भालेराव)
आदिवासी तालुका म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या किनवट तालुक्यातील रहिवासी असलेले लोकप्रिय यूट्यूब चैनल, आज कि न्यूज पोर्टल चे संपादक, अभिनेते नसीर तगाले यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत सिने क्षेत्र, पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना मुंबई येथे लेजंड दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केसीएफ(KCF) म्हणजे कृष्णा चव्हाण फाउंडेशन च्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमात नसीर तगाले यांना सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थित त्यांना मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन11 जुलै 2021 रोजी सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार त्यांना सतत तीन वर्षापासून त्यांना देण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे मागे त्यांचे कर्तुत्व, जिद्द, चिकाटी, आणि काहीतरी करण्याची धडपड दिसून येते.
किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात सर्वप्रथम ‘आज कि न्यूज’ यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन-प्रशासन च्या लक्षात आणून देण्याचे कार्य सोशल मीडिया द्वारे केले गेले व आजही ते करीत आहेत.
आपले कार्य करीत प्रत्येक बातमीचा मागोवा घेऊन वाचकापर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या अनेक बातम्यांची दखल खासदार ,आमदार वरिष्ठांपर्यंत घेण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी ची संघटना ‘इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया’चे सल्लागार म्हणून काम करत आहे. किनवट तालुक्यात प्रचंड प्रमाणात मटका,जुगार चालू होता याबाबत आवाज उठवत अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यामुळे याची दखल किनवट चे आमदार भीमराव केराम व हिंगोली चे खासदार मा. हेमंत पाटील यांनी घेऊन त्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुरस्काराचे आयोजक कृष्णा चव्हाण त्यांचे त्यांनी आभार मानले व यापुढेही आपण सतत कार्यरत राहू असे सांगितले.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल किनवट टुडे न्युज चे संपादक आनंद भालेराव, mcn न्युज च्या पत्रकार शेख परवीन,किनवट व्हायरल न्युज चे संपादक शेख अतिफ भाई यांनी आजकी न्युज कार्यालयात जाऊन सत्कार केला.
किनवट तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांकडून, मित्र मंडळी कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.