मुसळधार पावसाने बोधडी येथील् जनजीवन विस्कळीत , घर कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली
किनवट/ बोधडी खु.:दि.१४/७/०२२
गेल्या सात ते आठ दिवसांपासून सतत संततधार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोधडी खुर्द येथील जन जिवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.
सतत कोसळत्या मुसळधार पाऊसामुळे काल रात्री अंजनाबाई वावळे व बापुराव वावळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी टळली,.’देव तारी त्याला कोण मारी’,ह्य म्हणी प्रमाणे घरातील सर्व सदस्य दोन लहान मुले, म्हातारी आई ही रात्रीच्या वेळी घरातच झोपलेले होते, अचानक घराची भिंत हि बाहेरच्या बाजूला धाडकन पडल्याने एक मोठा आवाज झाला, शेजारच्या लोकांनी हे आवाज ऐकून धावत आले, व घरातील मुले म्हातारी यांना घराबाहेर काढण्यासाठी मदत केली.ह्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी टळली.
भिंत कोसळून घरातील सर्व संसार उपयोगी समान नुकसान झाले असून दारातच उभी असलेलीMH26Bs1504 हि मोटारसायकल भिंत कोसळल्यामुळे अक्षरशः चुराडा झाली आहे.बोधडी खुर्द येथील पोलिस पाटील श्री बालाजी गिरी यांना बोलावून सदरील घटनेची माहिती तलाठी साहेब, व ग्रामसेवक साहेब, यांना फोन वरून माहिती देण्यात आली.
सतत कोसळणाऱ्या पाऊसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने ठिक ठिकाणची रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे बोधडी खुर्द ते किनवट मार्ग कोठारी नाला पाणी आल्यामुळें वाहतूक व्यवस्था बंद असुन अनेकांनाचे आरोग्याच्या दृष्टीने हाल होत आहेत.