प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिकची विशेष मागणी; पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा
नाशिक : मुंबई येथील लाल बागचा राजा येथे वार्तांकनासाठी गेलेले ए बी पी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना तेथील स्थानिक पोलीस निरीक्षकाने वार्तांकन करण्यास रोखले व धक्का देत बाहेर काढले तसेच अवार्च भाषेचा वापर करण्यात आला. पत्रकारांना दिलेली ही वागणूक पोलीस अधिकाऱ्याचे बेशिस्तीचे प्रदर्शन करणारी असल्याने अशा पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करावे अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याबाबत नाशिक येथील प्रेस संपादक व पत्रकार संघ यांचे वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना याबाबत निवेदन देत निषेध नोंदविला आहे .
कोणतीही आपत्ती असो अपघात असो की घटना असो सर्व प्रथम पत्रकारच उपस्थित राहतो. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता बातमी जनतेपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून समजला जातो पण वार्तांकन करताना पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणे शरमेची बाब असून लाल बाग येथील झालेल्या प्रकाराबाबत सदर पोलीस निरीक्षक यास निलंबित करावे याबाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा कार्यकारिणीने संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशाने व राज्य सरचिटणीस नवनाथ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जिल्हाधिकारी सुरज माढरे यांना तर नाशिक जिल्हा पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जैन, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, जिल्हा संघटक मनोहर भावनाथ, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील खरे, जिल्हा कोषाध्यक्ष्य शरदचंद्र खैरनार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समशाद पठाण, मार्गदर्शक सुरेश भोर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना सन्मानाची वागणूक द्यावी व सदर पोलीस निरीक्षकांस तात्काळ निलंबित करावे अशा मागणीचे निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री यांना पाठविले जाईल असे आश्वासन दिले.