किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

भटक्यांच्या पालावर जाऊन “स्वीप कक्ष 83 किनवटच्या” वतीने दिली मतदान करण्याची शपथ !

किनवट : पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात घाम गाळून दगडफोडी करणाऱ्या भटक्यांच्या पालावर जाऊन ” स्वीप कक्ष 83 किनवटच्या ” वतीने मतदानाचा हक्क बजावण्याची जाणीव करून मतदानाची शपथ दिल्याने “यावर्षी आम्ही मतदान करणारच !” अशी ग्वाही तेथील मतदारांनी दिली.
तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत शिवणी परिसरात उघड्या-बोडक्या माळरानावर भटक्या समाजाची पालावरची वस्ती आहे. कुटूबाच्या उदरभरणासाठी डोंगर, दरी कपारीतील दगड फोडणे हा ते व्यवसाय करतात. निवडणूक येतात जातात परतु ही मंडळी मतदानापासून अलिप्तच राहते. परंतु असे एकही मतदार मदानापासून अलिप्त राहू नये म्हणून 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातर्गत 83- किनवट विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 15-हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, सामान्य मतदारात मतदानाविषयी जनजागृती व्हावी व मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने स्थापन केलेल्या स्वीप कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. 83- किनवट विधानसभा मतदार संघात येणाऱ्या किनवट व माहूर तालुक्यातील कमी मतदान असलेल्या अतिदूर्गम , डोंगरी पाडा , गुडा , वाडी तांड्यावर जाऊन सर्वसामान्य घटकापर्यंत मतदान जनजागृती कक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

तालुक्यातील अतिदुर्गम शिवणी गावाजवळ विविध काम करण्यासाठी आलेल्या लोकांचे पाल टाकून वास्तव्य आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदार पाल टाकलेले दिसून आल्यानंतर त्या काम करणाऱ्या कष्टकरी कामगार लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती करण्यात आली आणि मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी स्वीप कक्षाचे प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, सर्व सदस्य प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. पंजाब शेरे, रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर, ग.नु. जाधव, भूमय्या इंदूरवार, शाहीर नरेंद्र दोराटे आणि साहेबराव वाढवे या कलावंतासह तेथील कामगार वर्ग उपस्थित होता.

” शिवणी शेजारी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भटक्यांच्या पालावर जाऊन मतदान करणे आपला हक्क आहे हे बजावले व आपल्या लेकरांना नियमीत शाळेत धाडावे , असे शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. आपणास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
-ज्ञानोबा बने ,
स्वीपकक्ष प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी, किनवट”

93 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.