किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जि प टेकामांडवा शाळा द्वितीय।

जिवती प्रतिनिधी: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये जिवती तालुक्यांतून जि प उच्च प्राथमिक केंद्रशाळा टेकामांडवा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
जिवती पासून 12कि.मी.अंतरावर असलेली शाळा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.गुणवत्तेची कास धरत या शाळेने मागील काही वर्षांपासून शाळेला गुणवत्तेत पुढे आणले आहे.


मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मेहनत घेत शाळेचा गुणात्मक दर्जा उत्तम ठेवला आहे.लोकसहभाग , माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती सहभाग आणि डॉ.भागवत रेजीवाड साहेब, हेमंत भिंगारदेवे साहेब संवर्ग विकास अधिकारी जिवती,धनराज आवारी साहेब गटशिक्षणाधिकारी जिवती, सुनिल झोडे साहेब,अण्णाजी आडे सर ,किसन बावणे सर केंद्रप्रमुख,बी आर सी पं स जिवती यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन।मु अ एल एम पवार ,दिपक गोतावळे( विषय शिक्षक),सहशिक्षक- रुपेश मांदाळे,उषा डोये,मुखळा मलेलवार, यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेला प्रगती पथावर आणले आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव सुरणर, उपाध्यक्ष साकरुबाई गायकवाड , सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत टेकामांडवा, यांनी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले.याबद्दल शुभांगी राऊत सरपंच, भीमराव कंचकटले उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि समस्त गावकरी तसेच माता पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले.
शाळेची रंगरंगोटी, सुविचार, वर्ग सजावट,क्रीडांगण, परसबाग,वाचनालय, गुणवत्ता पुर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा,नवोदय , शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची प्रगती,बाल आनंद मेळावा, मेरी माटी मेरा देश उपक्रम,आजादी का अमृत महोत्सव उपक्रम, नवरत्न स्पर्धेतील सहभाग, ग्रामस्थांचा सहभाग,शाळेला केलेली आर्थिक मदत, माजी विद्यार्थी यांच्याकडून वस्तूरुपाने मिळालेले आर्थिक सहकार्य,स्वयंसेवी संस्था मॅजिक बस व सिके यांचे सहकार्य, व वरचेवर मिळत असलेला लोकसहभाग या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाले ‌।
येत्या काळामध्ये जि प उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा एक मॉडेल शाळा बनणार आहे असे येथील शिक्षकांनी मत व्यक्त केले।

147 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.