नांदेड येथिल वीर बाल दिवस सांगता कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री मंगळप्रसाद लोडा यांची पत्रकार परिषद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ संजीव कुमार गायकवाड :
नांदेड येथिल वीर बाल दिवस सांगता कार्यक्रमासाठी मंत्री मंगळप्रसाद लोडा हे आज नांदेड येथे आले असता त्यांनी नियोजन भवन नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तुन महाराष्ट्रात पहिल्यांदाचं साजरा करण्यात येत असलेल्या वीर बाल दिवस या कार्यकर्माची सांगता त्यांनी गीत गाऊन केली.यावेळी देश विदेशातील सिख जनसमुदाय उपस्तित होता.
नांदेड जिल्ह्यात 15 ठिकाणी क दर्जाचे पर्यटन स्थळाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यात साफ स्वच्छालय जाळी बांधकाम,सुरक्षा कर्मी,इ.चा समावेश आहे. होट्टल येथील ऐतिहासिक मंदिराचे काम करण्यासाठी 25 लाख रुपयेची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील 121पर्यटन स्थळाचे पण लवकरच अत्याधुनिकरण करण्यात येनार आहे असेही ते म्हणाले .
नांदेड येथील किल्ला परीसर स्वछ करून पुनर्वसन करण्यासाठी निधी देण्यात देणार,लोकल टूरिजम लोकांची कमेटी स्थापन करणार, जिल्यातील 17 iti मध्ये स्किल कोर्सेस चालू करणार,9 विधानसभा मध्ये जॉब भरती घेणार, विविध कोशल्य विकास कार्यक्रमांतून ग्रामीण भागातील उद्योजकांना बळ देऊ.असे सांगितले.
पत्रकार संजीवकुमार गायकवाड यांनी iti च्या विध्यार्थीसाठी जिल्यात tet सेंटर उपलब्ध करून द्यावा. tet सेंटर व iti च्या विध्यार्थीणा रहान्यासाठी वसतिगृहाचे निधी अभावी बांधकाम बंद असून लवकरात लवकर निधी द्यावा,यावर उत्तर देताना त्यांनी जिल्यातील आय.टी.आय विद्यार्थ्यांणा लवकरच tet सेंटर उपलब्ध करून देण्यासाठी नकी प्रयत्न करू व iti विध्याथ्यासाठी बांधकाम करण्यात आलेल्या व सध्या निधी अभावी जिल्ह्यात काम बंद असलेल्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले.
यावर्षी 5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील मूर्तिकार लोकांनंसाठी माळाकोळी येथे एक स्किल सेंटर चालू करणार असल्याचे ही यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे. यावेळी फक्त नायगाव विधानसभेचे आम.राजेशजी पवार हे उपस्थित होते.