प्रामाणिक पणे मुख्याध्यापक वसंतराव सिरसाट यांनी सापडलेला मोबाईल केला परत
नांदेड प्रतिनिधी
नांदेड : नांदेड शहरातून प्रवासा दरम्यान शहरात सावते नामक व्यक्तीचा चाळीस हजार रुपये किमतीचा प्लस वन स्मार्ट फोन दोन दिवसापूर्वीच हरवला होता. याच दरम्यान लोहा तालुक्यातील उमरा येथील रहिवाशी व नांदेड शहरात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले वसंतराव सिरसाट यांना तो मोबाईल सापडला. त्यांनी ही माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक- शिवाजीराव सिरसाट यांना दिली.
सदर मोबाईल रेकॉर्ड वरून खात्री करत शरद सुभाष सावते (रा .महाडा कॉलनी कौठा) यांचाच हा मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ठाण्यात बोलावून पोलीस व मुख्याध्यापक – वसंतराव सिरसाट यांच्या उपस्थितीत सावते यांना सदर मोबाईल स्वाधीन करण्यात आला . यावेळी शरद सावते यांनी मुख्याध्यापकाच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रशंशा करून पेढा भरवत तोंड गोड करून मुख्याध्यापक व पोलीस प्रशासन यांचे आभार मानले. आजही काही माणसे समाजात आपल्या प्रामाणिकपणाचे कर्तव्य पार पाडतात हे इतरांसाठी आदर्श ठरणारी बाब आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.