प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्राचे कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू
मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे कायदेविषयक सल्ला केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. सदर कायदेविषयक सल्ला केंद्र संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे खोपट येथे कायदे विषयक सल्लागार ॲड.अमोल सकट यांच्या कार्यालयात सुरु करण्यात आले असून सदर कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, ठाणे जिल्हाध्यक्ष किरण पडवळ, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, उच्च न्यायालयाचे वकील गणेश पाटील, समाजसेवक संजय भुजबळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कायदे विषयक सल्लागार ॲड.अमोल सकट यांनी संबंधित सल्ला केंद्र हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संपादक, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना प्रथम प्राधान्य देणार असून पत्रकारांचे न्याय हक्कासाठी आम्ही संघाच्या सोबत आहोत असे प्रतिपादन केले. तर राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोणत्याही पत्रकारांना कायदेविषयक सल्ला हवा असेल तर तो आपल्या कार्यालयामार्फत दिला जाईल तसेच पत्रकारांवर एखादे संकट आले अथवा काही समस्या निर्माण झाली तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुंबई, ठाणे कार्यालय किंवा संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले.