संत सेवालाल महाराज २८३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी. “थाटात निघाल्या मिरवणूका”
माहूर: तालुक्यातील ईवळेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत सेवालाल महाराज २८३वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. गावातील संपूर्ण बंजारा समाजातील तरुण,तरुणी माता-भगिनी एकत्र येऊन तरुण व महिलांनी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या,महिलानी नटून सजून सकाळी प्रभात फेरी काढून ग्राम सफाई करत संत सेवालाल महाराज कथा श्रवण करून हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला.
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी हा सोहळा साजरा करण्यात आला.संत सेवालाल महाराज यांचे ग्रंथ बंडू भोजु राठोड यांनी दि.८फेब्रुवारी ते १५फेब्रुवारी पर्यंत वाचन केले.अखंड परपंरा जपलेल्या ईवळेश्वर वासीयाकडून यावर्षी संत सेवालाल महाराज यांचे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या थाटात केले होते.संत सेवालाल महाराज यांची २८३वी जन्मोत्सव करुन सांगता करण्यात आली.व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी रवी जाधव नाईक,नारायण राठोड कारभारी,अर्जुन जाधव नाईक,बळीराम जाधव कारभारी,बि.एल चव्हाण,ज्ञानेश्वर कऱ्हाळे,भारत जाधव ग्रा.प,सदस्य,शिवाजी राखोंडे,बदू धेना राठोड,बंडू भोजु राठोड,दुधराम राठोड,विजय बल्लदेव जाधव,परसराम जाधव,विष्णू जाधव,सुभाष राठोड,अनिल जाधव,प्रदिप पतंगे,बबलु प्रेम जाधव,अतिष राठोड,सचिन जाधव,मनोज राठोड,दिपक जाधव,सुजित जाधव,हिरासिंग राठोड संदिप चव्हाण आणि ईवळेश्वर येथील ग्रामवासी व तरुण मंडळी माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.