किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच महिला फौजदार म्हणून स्मिता जाधव रूजू;सौ.भावना दीक्षित कडून स्वागत.
किनवट(आनंद भालेराव)
बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर येथील किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच महिला फौजदार म्हणून स्मिता जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यापासून जवळपास दीडशे किलोमीटर लांब असलेल्या किनवट पोलीस ठाण्यात महिला फौजदार नव्हत्या. लॉकडॉऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर आता महाविद्यालय, शाळा, खाजगी शिकवणी वर्ग सुरू झाले आहेत. वरील ठिकाणी टार्गेट मुलांकडून विद्यार्थिनींना मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे किनवट पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक होती. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी येथील पोलीस ठाण्यात सुनिता जाधव यांचे नेमणूक करून विद्यार्थीनीना व महिलांना दिलासा दिला आहे.
भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ भावना दीक्षित मॅडम यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन स्मिता जाधव यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.