अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सिडाम यांची नियुक्ती
किनवट ता.प्र दि १३ देशपातळीवर आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारी संघटना असणा-या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सिडाम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
गेल्या सहा दशका पासुन आदिवासी समाजाच्या सामाजिक, राजकिय, आर्थिक विकासासाठी शासन दरबारी देश पातळीवर विविध आंदोलने करुन शासन निर्णय निर्गमीत करण्यास भाग पाडणारी संघटना म्हणुण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नावाजलेली आहे.
नव्याने परिषदेची पुर्नःबाधनी करण्याचे काय देश पातळीवर सुरु असुन त्याचाच एक भाग म्हणुन गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाच्या विकासाठी नेहमी पुढाकार घेणारे बिरसामुंडा पुतळा कृती समिती किनवट चे प्रमुख संजय सिडाम यांची परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या आदेशान्वये राज्य अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी नियुक्तीचे पत्र दिले. त्यांच्या या निवडी बद्दल आ. भिमराव केराम, आ. अशोक उईके, मा. जि.प. अध्यक्षा जनाबाई डुडुळे, माजी नगराध्यक्ष इसा खान, व्यंकटराव नेम्मानिवार, कें. मुर्ती, शेषेराव कोवे, आदिंनी शुभेच्छा दिल्या.
येत्या दोन महिण्यात जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्षाची नियुक्ती करणार असल्याचे संजय सिडाम यांनी सांगितले आहे.