किनवट तालुक्यातील मुंडे भगिनींनीच्या समर्थकांचे राजीनामासत्र सुरू.
किनवट/प्रतिनिधी:
राज्याच्या माजी मंत्री तथा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे ना राज्य भाजपा वेळोवेळी शह देत आहे तर केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदासाठी टाळल्यामुळे महाराष्ट्रात जबरदस्त पत्र पडसाद उमटू लागले आहेत .
बहुजनह्रदय सम्राट,लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या कन्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना पक्ष अंतर्गत डावळणे आणि त्यांची राजकीय कारकीर्द थांबणे याकरिता विक्रमवीर खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथजी मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळा मध्ये स्थान न दिल्यामुळे आज महाराष्ट्रराज्या मध्ये तमाम मुंडे समर्थक नाराज आहेत, आणि भाजप चा राजीनामा देत आहेत. यामध्ये जि.प.सदस्य,सभापती,नगरसेवक, व भाजप चे प्रदेश पदाधिकारी राजीनामे देत आहे, किनवट तालुक्यातील पंकजाताई यांचे जवळचे म्हणून ओळख असणारे बालाजी (बंटी)फड, प्रा.बिभीषण पाळवदे सर(प्रदेश कार्यकारणी सदस्य)आत्माराम मुंडे (कृषी उत्पन्न बाजार समिती) शिवा आंधळे (नगरसेवक),शाम केंद्रे(माजी भाजपा तालुकाध्यक्ष), इत्यादी मंडळींनी राजीनामे दिले आहेत.