किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवटला जिल्ह्याचा दर्जा देऊन मांडवी, बोधडी आणि इस्लापूरला तालुके करण्याच्या मागणीसाठी उद्या किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने उध्या सर्व पक्षी धरणे आंदोलन

KTN महाराष्ट्र NEWS | नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन किनवटला जिल्ह्याचा दर्जा सह मांडवी बोधडी आणि इस्लापूर तालुक्याच्या निर्मितीसाठी 17 मार्च रोजी किनवट जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने सर्व पक्ष धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसलेना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला आहे. तीस वर्षापासून ही प्रलंबित मागणी असल्यामुळे सर्वांची वज्र मूठ तयार करून लक्षवेधी धरणे आंदोलनासाठी सर्वांनी स्पेस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्रातही आणि राज्यातही भाजपाचे सरकार असल्यामुळे नेत्यांनी रेटा देऊन मागण्या पदरी पाडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतील काय? असा सवाल जनसामान्यांना पडला आहे.
नांदेड आणि किनवट यांच्यातील 200 किलोमीटर लांब पल्ल्याचा अंतर लक्षात घेता किनवट जिल्ह्याचा दर्जा आणि जिल्हा निर्मितीसाठी तालुक्याच्या संख्येची आवश्यकता असल्याने इस्लापूर आणि मांडवी ला तालुक्याच्या दर्जा दिल्यास अति दुर्लक्षित मागास आदिवासीबहुल तालुक्यातील तमाम नागरिकांच्या सोयीचे होणार आहे.

किनवट तालुक्यात सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे तीन जिल्ह्याचे प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय, शबरी विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय, वन विभाग प्रादेशिक चे सहाय्यक वन संरक्षक वन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम आणि पाणीपुरवठ्याची उपविभागीय कार्यालय, मृदा व जलसंधारणाचे उपविभागीय कार्यालय, लघुपाटबंधारे चे उपविभागीय कार्यालय, पाटबंधारे विभाग मध्यम प्रकल्पाचे कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, भूमी अभिलेखाचे उपविभागीय कार्यालय, राज्य उत्पादन शुल्काचे उपविभागीय कार्यालय अशी सर्वच कार्यालयाची उपविभागीय कार्यालय कार्यान्वित आहेत.

त्यामुळे किनवटला जिल्हा करण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर फारसा भार पडणार नाही. उलट पक्षी किनवट तालुक्यातून सरकारला प्रचंड प्रमाणावर राजस्व सुद्धा मिळत असते.
एवढे असतानाही सरकार जाणीवपूर्वक किनवटकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून एक होत सर्वांनी एक संघटित होऊन 17 मार्च रोजी तहसील कार्यालय समोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नामदेवराव केशवे व व्यंकटराव नेमानिवर मान्यवर यांनी केले आहे.

220 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.