प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर
सिंधुदूर्ग : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण महिला अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हा अध्यक्ष गोपाळ पावसकर, जिल्हा संघटक अमित हर्डीकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय मांजरेकर, जिल्हा महिला संघटक दिव्या वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष शशांक कुमठेकर, जिल्हा सचिव प्रणित पालव, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीवरद वाटवे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जाफर शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड निलेश कोचरेकर, सल्लागार शिवराम पालव व विष्णू चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव,नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, डॉ.संजय भिडे, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.