अपघातग्रस्त पत्रकाराला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने केली तातडीची आर्थिक मदत* *पत्रकारांचे कल्याण करणे हाच संघटनेचा उद्देश : डी. टी. आंबेगावे
सिंधुदुर्ग : दैनिक सिंधुदुर्ग समाचार या वृत्तपत्राचे पत्रकार श्री. शंशाक कुमठेकर यांना मालवण येथे मोटार सायकल वरुन जात असताना समोरून येणाऱ्या एसटीची मोटारसायकला धडक लागून त्यांच्या पायाचे हाड मोडुण गंभीर जखमी झाले. त्यांना मालवण वरुन ॲब्युलन्सने कुडाळ येथील नवांगुर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पायाच्या हाडाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यांच्या ऑपरेशनसाठी ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला. ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समजल्यानंतर तात्काळ आर्थिक मदत करून अपघातग्रस्त पत्रकारांच्या कुटुंबांना आधार देण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. डी.टी. आंबेगावे, कोकण संघटक श्री श्रीराम कदम, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.गोपाळ पावसकर, श्री. सिध्देश मसुरकर, सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख श्री. संजय मांजरेकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने डॉ. नवंगूर यांचेही आभार मानले.